Pumpkin Benefits: हिवाळ्यात भोपळा खाल्ल्याने आरोग्यविषयक हे फायदे होतील !

Pumpkin Benefits: हिवाळ्यात भोपळा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचा वापर करून अनेक स्वादिष्ट पदार्थही बनवले जातात. भोपळ्याची भाजी तुम्ही अनेकदा केली असेलच, पण त्यापासून खीर बनवता येते. भोपळा अनेक रोगांपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी आहे. यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. भोपळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. भोपळा खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

आराेग्य विषयक माहिती, आयुर्वेद, आहार, फिटनेस तज्ज्ञांचं मार्गदर्शन मोफत मिळविण्यासाठी इथे क्लिक करा

1. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त

भोपळ्यामध्ये मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात आढळते. यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. याच्या सेवनाने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

2. हृदयासाठी फायदेशीर

भोपळ्याच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करतात.

3. वजन कमी करा

वजन कमी करायचे असेल तर भोपळ्याचा आहारात समावेश करू शकता. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

4. केसांसाठी फायदेशीर

केसांसाठीही भोपळ्याचे सेवन फायदेशीर मानले जाते. यामध्ये पोटॅशियम, झिंक आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

5. डोळे निरोगी ठेवण्यास उपयुक्त

भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए पुरेशा प्रमाणात आढळते, जे डोळे निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. याचे सेवन केल्याने डोळ्यांचे आजार टाळता येतात.

6. बद्धकोष्ठता मध्ये उपयुक्त

भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर आढळते, जे पचन व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.