Tips for Getting Pregnant Fast : लवकर गर्भवती होण्यासाठी या टिप्स फॉलो करा, गर्भधारणा होण्यासाठी महिलांनी या गोष्टींची काळजी घ्यावी

आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास क्षण असतो. आजच्या अस्वास्थ्यकर जीवनशैलीत महिलांना गर्भधारणा होण्यात अडचणी येत आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही लवकर गर्भधारणा करू शकता.

Tips for Getting Pregnant Fast :- प्रत्येक स्त्रीसाठी आई होणे हा सर्वात मोठा आनंद असतो. प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यात आई होण्याचे ठरवते. लग्नानंतर अनेक वेळा आई होण्यासाठी खूप वाट पाहावी लागते. काही महिलांना मूल होण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

आराेग्य विषयक माहिती, आयुर्वेद, आहार, फिटनेस तज्ज्ञांचं मार्गदर्शन मोफत मिळविण्यासाठी इथे क्लिक करा

गरोदर राहण्यासाठी शारीरिक संबंधांसोबतच अनेक बाबींची काळजी घ्यावी लागते. जेणेकरून शुक्राणू अंड्याला भेटतात आणि निरोगी गर्भ विकसित होतो. या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही लवकर गर्भधारणा करू शकता.

महिलांना महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना मासिक पाळी येते. काही महिलांना लवकर तर काही महिलांना मासिक पाळी उशीरा येते. ही गोष्ट गर्भधारणेत अडचण ठरु शकते. त्यामुळं असा त्रास तुम्हालाही असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ह्या दिवसांमध्ये लैंगिक संबंध ठेवा
मासिक पाळी यायच्या 2 आठवडे आधीचा काळ ऑव्युलेशन पीरियड असतो. या काळात केलेला सेक्स हा गर्भधारणेसाठी उत्तम मानला जातो. डॉक्टरही याच काळात गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देतात. या काळात महिलांच्या शरीरात प्रजननासाठी अंडकोष तयार होतो. त्याच काळातील लैंगिक संबंधातून गर्भधारणा होण्याची 60 ते 70 टक्के शक्यता असते.

शारीरिक संबंध केल्यानंतर आराम करा
जर तुम्हाला लवकर गर्भधारणा करायची असेल, तर शारीरिक संबंध ठेवल्यानंतर 10 मिनिटे विश्रांती घ्या. शारीरिक संबंध बनवल्यानंतर लगेच आंघोळ केली किंवा बाथरूममध्ये गेल्यास शुक्राणू बाहेर पडतात. अशा स्थितीत नातेसंबंध केल्यानंतर 10 मिनिटे झोपा, यामुळे शुक्राणूंना योग्य दिशेने जाण्यास मदत होते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते.

धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा
गर्भधारणेसाठी, व्यक्तीने धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहिले पाहिजे. मद्यपान आणि धूम्रपान केल्याने स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे गर्भधारणा होण्यास त्रास होतो.

वजन नियंत्रित ठेवा
वजन हा गर्भधारणेतील मोठा अडसर ठरु शकतो. यामुळं महिलांमध्ये फेलोपिअन ट्यु आणि ओवरी बंद होते, ज्याचा गर्भधारणेत मोठा सहभाग आहे. त्यामुळं वजन कमी करणं हा गर्भधारणेसाठी उत्तम उपाय आहे.

आहार कोणता घ्यावा ?
लवकर गर्भवती होण्यासाठी आरोग्यदायी आहाराचं सेवन अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं गर्भधारणेआधी उत्तम आहार घ्या. बऱ्याचदा महिलांमध्ये आयर्न आणि कॅल्शियमची कमी असते. त्यामुळं फर्टिलायझेशन लवकर होत नाही.